yuva MAharashtra रानभाज्या ओळख व पाककृती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

रानभाज्या ओळख व पाककृती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

 रानभाज्या ओळख व पाककृती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद 





सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने “Wild Vegetables and its Recipes (रानभाज्या ओळख आणि पाककृती)” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा व पाककृती सादरीकरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन आणि रानभाज्यांचे पोषणमूल्य यांचे महत्त्व विशद केले. रानभाज्या या केवळ पारंपरिक आहाराचा भाग नसून स्थानिक वनस्पती विविधतेच्या संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विभागाची भूमिका डॉ. एच. व्ही. वांगीकर, विभागप्रमुख, वनस्पतिशास्त्र विभाग यांनी केली. त्यांनी विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची योग्य ओळख, त्यांची शास्त्रीय माहिती, पारंपरिक उपयोग तसेच पोषणमूल्य यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्थानिक रानभाज्यांपासून तयार केलेल्या आकर्षक व पौष्टिक पाककृती सादर केल्या. प्रत्येक विद्यार्थ्याने संबंधित वनस्पतीची माहिती, स्थानिक व शास्त्रीय नावे, उपयोग तसेच पाककृतीविषयी माहिती प्रभावीपणे मांडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना जैवविविधता, लोकवनस्पतिशास्त्र आणि पारंपरिक अन्नज्ञान यांची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. मंगेश गावित, व डॉ. अमोल पाटील यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. वसुंधरा खोत यांनी केले, तर सौ. रोहिणी कुंभार यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास सौ. भारती मठपती, डॉ. दादा नाडे, श्री. अक्षय खडतरे, डॉ. वर्ष कुंभार, डॉ. भवारी, श्री. सतीश कांबळे आदी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांचे महत्त्व, स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन आणि पारंपरिक पाककृतींचे जतन याबाबत जागरूकता निर्माण झाली.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)