yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा












सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. तसेच ‘तंबाखूमुक्त भारत’ अभियानांतर्गत उपस्थितांनी तंबाखूमुक्त भारताची शपथ घेतली.

एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना संचलनाचे प्रात्यक्षिक सादर केले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेत तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल मनाली दाभोळकर हिचा, तर एन.सी.सी. कॅडेट प्रकाश मोरे याची मुंबई पोलिस दलात निवड झाल्याबद्दल, कॅडेट गुलाब पाटील याची इंडियन एअर फोर्समध्ये निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल आणि कॅडेट किशोर कोळी याची इंडियन आर्मीमध्ये निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व स्पष्ट केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण करून त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मिळालेले स्वातंत्र्य जपणे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी, शिस्त, प्रामाणिकपणा, एकता आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासावी. देशाच्या विकासामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रुपाली कांबळे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे, एन.सी.सी. विभागप्रमुख डॉ. महेश कोल्हाळ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)