डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान उपक्रमाचे आयोजन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान उपक्रमाचे आयोजन
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जिल्हा बार्टी,आदिवासी विभाग (टी. आर.टी.आय), सारथी, महाज्योती व अमृत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सहाय्य जनजागृती उपक्रम व अंमली पदार्थ प्रतिबंध अभियान या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे,
सविता पाटील (समतादूत बार्टी), राहुल कुलकर्णी (अमृत संस्था, कोल्हापूर जिल्हा सह. समन्वयक), डॉ. अभिजीत आंबेकर (क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज ), डॉ. अमृता सोनवणे (समुपदेशक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मिरज), डॉ. विक्रांत हजारे(मानसोपचार तज्ज्ञ, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज) महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए.एल जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महाविद्यालयातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याला ही योजना उपयुक्त ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांचा यात समावेश आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्तीचा व इतर शिष्यवृत्त्यांचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी 'अंमली पदार्थ प्रतिबंध अभियान' या विषयावर डॉ. अभिजित आंबेकर व्याख्यान देताना विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते अंमली पदार्थांपासून दूर राहतील. त्यांचे ध्येय पूर्ण होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी शासनाने हे अभियान राबविले आहे. यावेळी सविता पाटील (समतादूत बार्टी) यांनी विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानाची पीपीटी द्वारे विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागाने केले होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिष्यवृत्ती विभाग प्रमुख डॉ. नरेश पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. आर. एस. काटकर यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील
सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment