डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगली चा खेळाडू कृष्णा जयकुमार सुतार यांने ड्रॅगन बोट या क्रीडा प्रकारामध्ये सिल्वर मेडल पटकावत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवले अशाप्रकारे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांने यश मिळवून भारती विद्यापीठ आणि डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.
१६ व्या राज्यस्तरीय कॅनो-स्प्रिंट व ड्रॅगन बोट खुला गट अजिंक्य स्पर्धेचे आयोजन दि. ४ ते ६ जुलै २०२५ रोजी बिरनाळे तलाव, जत या ठिकाणी करण्यात आले. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी विद्यार्थ्यांस पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व या मिळालेल्या यशाबद्दल कौतुक केले.
कृष्णा सुतार या विद्यार्थ्याने यापूर्वी अनेक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मध्ये तसेच ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी स्पर्धेमध्ये आपला सहभाग घेऊन दैदीप्यमान यश मिळवलेले आहे. सदर विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. ए. ए. तुपे यांचे मार्गदर्शन लाभले. अशा या गुणवान खेळाडूस भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल.जाधव, डॉ. डी. पी. नाडे, प्रा ए.बी. खडतरे, डॉ. ए.एच.जाधव, डॉ. टी. आर. लोहार, प्रा. एच. व्ही.वांगीकर, प्रा. आर. एस. काटकर, श्री. बी. एच. मोरे व श्री. एस. एस जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment