डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश
सांगली : जत येथे पार पडलेल्या १६ व्या राज्यस्तरीय कॅनो-स्प्रिंट व ड्रॅगन बोट खुल्या स्पर्धेत महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. पार्थ एकनाथ कोळी व कु. श्रावणी रामचंद्र पाटील यांनी ड्रॅगन बोट या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवून महाविद्यालयाचे नावलौकिक वाढविले. त्यांच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील ही एक प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी या वेळी उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले ज्युनियर विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, डॉ. डी. पी. नाडे, श्री. ए. बी. खडतरे, प्रा. आर. एस. काटकर, श्री. एस. डी. पाकले, श्री. एस. बी. पाटील, डॉ. एस.आर. जाधव, डॉ. एम. व्ही. साळुंखे व श्री. ओ. एस.चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे यांनी मार्गदर्शन केले होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment