डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी इयत्ता १२ वी विद्यार्थ्यासमवेत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी सर्व प्राध्यापकांना गुलाबपुष्प देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. पोरे म्हणाले की, गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंच्या मार्गदर्शनासाठी आदर व आभार व्यक्त करण्याचा असतो. त्यामुळे या दिवसाला महत्त्व आहे. गुरुशिवाय सन्मार्ग सापडत नाही. प्रत्येकाने गुरूचा आदर करावा असे मत व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देताना इयत्ता बारावी एम.एल.टी. चा विद्यार्थी गौरव कुलकर्णी यांने गुरूंचे जीवनातील महत्त्व व
गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए. एल. जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. आर. एस. काटकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. डी. पाकले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment