डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थिनींना एस. टी. बस पास वाटप
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थिनींना एस. टी. बस पास वाटप
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना एस. टी. बस पासचे मोफत वाटप महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्र. प्राचार्य डॉ. पोरे बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून इयत्ता बारावी पर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुलींना निश्चित होईल अशी मला खात्री आहे. ही योजना ग्रामीण भागातील मुलींसाठी वरदान ठरणार आहे तिचा जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी लाभ घेऊन आपला शैक्षणिक विकास करावा. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्तीचा व इतर शिष्यवृत्त्यांचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव, प्रा. आर. एस. काटकर, प्रा. टी. आर. लोहार, श्री. शहाजी कापसे तसेच बारावी व व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment