Header Ads

Loknyay Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कदम महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कदम महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, जात पडताळणी शिबिर आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते करण्यात आले.
   
या प्रसंगी बोलताना डॉ. कणसे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच आचार आणि विचार यांची सांगड घातली. तसेच त्यांनी तत्त्वज्ञानाला कृतीची योग्य जोड दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांती घडवून आणली. त्यांनी शोषित, वंचित घटकांमध्ये आत्मबळ निर्माण करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या विचारात आणि आचारात प्रखर राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा होती. शिकल्याशिवाय माणसाला न्याय, अन्याय आणि हक्क याची जाणीव होणार नाही असा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या विचारांचे जतन होणे गरजेचे आहे.
        
या वेळी महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, प्रा. जयश्री हाटकर, डॉ. कृष्णा भवारी, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नरेश पवार, प्रा. नंदकुमार नाटके, डॉ. विकास आवळे, प्रा. रुपाली कांबळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)