Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जात पडताळणी समितीची विशेष मोहीम

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जात पडताळणी समितीची विशेष मोहीम
सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय व जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समता सप्ताह निमित्त जातपडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगली जिल्हा जातपडताळणी समितीचे उपायुक्त खुशाल गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या वेळी गायकवाड यांनी पी.पी.टी च्या माध्यमातून जातपडताळणीची आवश्यकता काय व त्याची प्रक्रिया कशी असते या बद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


यासंबंधी सविस्तर माहिती सांगताना ते म्हणाले की, जातपडताळणी प्रक्रिया किचकट वाटत असली तरी समजून घेतल्यावर सोपी आहे. जातप्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन फॉर्म भरताना व्यवस्थित भरावा. कुठल्याही प्रकारचे स्पेलिंग मिस्टेक करू नयेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जातीचा पुरावा म्हणून वडील, आजोबा, पणजोबा, आत्या, चुलते यांचे जातनोंद मानीव दिनांका पूर्वीचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. तसेच रक्तसंबंधातील जातनोंद पुरावे सिध्द होणाऱ्या पुराव्यानिशी सादर करणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी. जी. कणसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त शासनाने राबविलेल्या या जातपडताळणी उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र लवकर मिळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. 

या प्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डाॅ. पी. एम. पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराला अभिलेखापाल तेजश्री थोरात, प्रकल्प सहाय्यक भाग्यश्री लामदाडे, समतादूत संयोगिता हेरकळ (बार्टी) तसेच श्री. दत्ता मोहिते यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले, सूत्रसंचलन प्रा. नरेश पवार यांनी केले तर प्रा. मंगेश गावीत यांनी आभार व्यक्त केले.  

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)