Header Ads

Loknyay Marathi

करिअर करण्यासाठी अथक परिश्रमाची गरज - विकास सावंत

करिअर करण्यासाठी अथक परिश्रमाची गरज - विकास सावंत

सांगली: स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी बाळगणे गरजेचे असते. कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर  अथक परिश्रमाला पर्याय नाही. परिश्रमाबरोबरच सातत्य राखले तर यश स्पर्धा परीक्षांमध्ये सहज शक्य आहे असे प्रतिपादन विकास सावंत अॅकॅडमीचे संस्थापक विकास सावंत यांनी केले.

येथील भारती विद्यापीठाच्या डॉ पतंगराव कदम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समिती विकास सावंत अॅकडमी मुंबई  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बॅंकिग विमाक्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावरील वेबिनारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होतेअध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख प्राे.डाॅ. शिवाजी बो-हाडे होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की बँकिग क्षेत्रासाठी स्वतंत्र यंत्रणा स्पर्धा परीक्षांचे आयोजन करते. बॅंक विमा या दोन्ही क्षेत्रांसाठी स्पर्धा परीक्षांचे स्वरुप साधारणपणे एकसारखेच असते मात्र कमी वेळेत प्रश्न सोडविताना काही क्लुप्त्या  वापराव्या लागतात. यावेळी त्यांनी काही प्रश्न अशा क्लुप्त्याचा वापर करुन उदाहरणासह  सोडवून दाखविले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे  यांनी आपल्या संदेशात म्हटले की  आजच्या या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही . त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्रोडाॅशिवाजी बो-हाडे म्हणाले की,   बँकिंग व विमा क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करुन घ्यावा तथापि प्रश्नप्रत्रिका सोडण्यासाठी शाॅटकट वापरावा लागत असला तरी यशाला मात्र शाॅटकट नसतो हे विद्याथ्यांनी लक्षात ठेवावे.  प्रास्ताविक स्वागत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समितीच्या समन्वयक डाॅ. वंदना सातपुते यांनी केले तर आभार प्रा. एच. व्ही. वांगीकर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. एनडी. पवार यांनी केले. या वेबीनारचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच अन्य विद्यार्थ्यांनीही घेतला.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)