Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल पुणे येथील विविध संशोधन संस्थाचे कामकाज समजून घेण्यासाठी दि.12 व 13 एप्रिल 2022 या दिवशी आयोजित करण्यात आली होती. या सहलीत बी. एस्सी. भाग 3 चे 34 विद्यार्थी व 3 प्राध्यापक सहभागी झाले होते.


विद्यार्थ्यांनी या सहलीत विविध संशोधन संस्थाना भेट देऊन तेथील कामकाज समजून घेतले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या सहलीत सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाची व्याप्ती व महत्व समजले व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस दिशा मिळाली.


या सहलीत विद्यार्थ्यांनी भारती विद्यापीठाच्या गोल्डन ज्यूबिली संग्रहालयाला भेट दिली व संस्थापक मा. डॉ.पतंगराव कदम यांचे कार्य तसेच भारती विद्यापीठाचा इतिहास जाणून घेतला. भारती विद्यापीठाने विद्यार्थ्यांची राहण्याची, रात्रीच्या जेवणाची व नाश्त्याची सोय केली.


या दोन दिवसात चार विविध संस्थांना भेट दिली. आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डायना बायोटेक, ईर्षा(Interactive Research School for Health Affairs (IRSHA), राष्ट्रीय सूक्ष्मजीव संपदा केंद्र (NCMR) अशा दर्जेदार संस्थांना भेट देऊन ही शैक्षणिक सहल यशस्वीरित्या संपन्न झाली. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाने सहलीचे नियोजन विभागप्रमुख प्रा. भारती भाविकट्टी, डॉ. भरत बल्लाळ व डॉ. मारुती धनवडे यांनी केले.

(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)