महात्मा जोतिबा फुले यांच्या मानवतावादी विचारांची समाजाला गरज : डॉ. डी. जी. कणसे
महात्मा जोतिबा फुले यांच्या मानवतावादी विचारांची समाजाला गरज : डॉ. डी. जी. कणसे
सांगली : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार करणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या मानवतावादी विचारांची समाजाला गरज आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी बोलताना ते म्हणाले की, 'समाजामध्ये जातीयवाद, धर्मवाद यामध्ये जो संघर्ष सुरू आहे, तो थांबविण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांचे एकोणिसाव्या शतकातील विचार आजही प्रेरणादायी आहेत. जोतिबांनी केलेले कार्य विधायक होते. प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतले. म्हणून समाजाने त्यांचा 'महात्मा' म्हणून गौरव केला. त्यांचे सत्यशोधकीय विचार समाजाने आचरणात आणले पाहिजेत.'
या वेळी महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, प्रा. जयश्री हाटकर, डॉ. कृष्णा भवारी, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके, प्रा. नरेश पवार यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment