आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादरीकरणामध्ये कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागास पारितोषिक
आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादरीकरणामध्ये कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागास पारितोषिक
सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. भरत बल्लाळ व विभागप्रमुख प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी आबेदा इनामदार कॉलेज, पुणे आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेत "सॅनिटरी नॅपकिन्स जैविक भट्टीत जाळल्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास" हा शोधनिबंध सादर केला. सदर शोधनिबंधासाठी त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. सदरची आंतरराष्ट्रीय परिषद विविध औषधांना दाद न देणाऱ्या सूक्ष्म जीवांचा अभ्यास या विषयावर आयोजित केली होती.
याबद्दल भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment