Header Ads

Loknyay Marathi

प्रत्येकाला सूक्ष्मजीवशास्त्राचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक : डॉ. डी.जी.कणसे

 प्रत्येकाला सूक्ष्मजीवशास्त्राचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक : डॉ. डी.जी.कणसे

सद्यस्थितीत सूक्ष्मजीवशास्त्राची गरज व त्यामध्ये असणाऱ्या संधी पाहता प्रत्येकाला सूक्ष्मजीवशास्त्राचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग; मायक्रो एनव्हायरॉन क्लब व मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘Microbiology in Present Scenario: scope, relevance and opportunities’ या विषवरील वेबिनार प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना  ते म्हणाले की, कोविडच्या साथीसारख्या जागतिक स्तरावरील समस्येचे उत्तर सक्षजीवशास्त्राच्या अभ्यासातूनच मिळू शकते, पर्यावरण संरक्षण व मानवी आरोग्यासाठी संशोधन करून सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी मानवी जीवन सुखी व सुरक्षित करण्यासाठी हातभार लावला आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता व आवड जाणून घेऊन सूक्ष्मजीवशास्त्रातील विविध संधीचा अभ्यास करावा व राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे असे अवाहन विभाग प्रमुख प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी केले. प्रा. डॉ. भरत बल्लाळ यांनी सूक्ष्मजीवशास्त्रातील  पदवीनंतर उपलब्ध संशोधन क्षेत्रातील,  सरकारी नोकरीमधील, फॉरेन्सिक सायन्स,  क्लिनिकल रिसर्च या क्षेत्रातील संधी, अल्पमुदती अभ्यासक्रम आणि पेटंटची संकल्पना या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. मारुती धनवडे यांनी विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षण व परदेशातील नोकरीच्या संधी याविषयी माहिती सांगितली.

स्वागत व प्रास्ताविक भारती भावीकट्टी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. मारुती धनवडे यांनी मानले. प्रा. अरीफ मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. 

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)