Header Ads

Loknyay Marathi

📚 वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा 📚

मेळघाटावरील मोहर

मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्य प्रदेश. त्यामुळे प्रचंड पावसाचे प्रमाण. त्या भागात अनेक लहान -लहान आदिवासी पाड्या अशीच एक पाडी(गाव )म्हणजे बैरागड तापी - खापरा – सिपना या  नद्यांच्या संगमावरच गाव . अत्यंत दारिद्र्य, अज्ञान, अनेक आजारानं पोखरलेलं. अशा गावात 1990 मध्ये डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे आले. या गावाचा सर्वागीण विकास करायचाच ही खूणगाठ बांधून. येथील लोकांच्या प्रबोधनासाठी शिक्षण, उत्सव अशा वेगळ्या वाटा शोधल्या यासाठी कधी कोर्टाचा हिसका बसला तर कधी कोर्टकचेरीचा हिसका दाखवून प्रबोधन केले. शेतीच्या विविध प्रयोगतून शेतीचे धडे दिले. धर्मातरांचा प्रश्नाला भिडले….असे अनेक प्रश्न त्यांनी धसाला लावले. वाजतागायत त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. हे करत असताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या, काय अनुभव आला, त्यांना ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्यात कितपत यश आलं. हे समजून घेण्यासाठी नक्की हे पुस्तक वाचा.

पुस्तक परिचय: प्रा. कु. सुलभा तांबडे