Header Ads

Loknyay Marathi

कला माणसाला बरेच काही शिकवून जाते, मात्र आयुष्याकडे कलाकाराच्या नजरेने बघायला शिकले पाहिजे - मा. सागर तळाशीकर

कला माणसाला बरेच काही शिकवून जाते, मात्र आयुष्याकडे कलाकाराच्या नजरेने बघायला शिकले पाहिजे - मा. सागर तळाशीकर
प्रत्येक माणूस हा कलाकार असतो. कला असते ती जोपासावी लागते. कला ही माणसाला जगायला शिकविते. वास्तविक माणसामाणसांमध्ये प्रेम निर्माण करणारी कला हीच खरी कला असते. मात्र आपणास सर्व काही येते असे जेव्हा माणसाला वाटते तेव्हा माणसांची प्रगती खुंटते. त्यासाठी आयुष्यभर काहीतरी शिकत राहिले पाहिजे असे मत प्रसिद्ध नाट्य, चित्रपट व मालिका अभिनेते मा. सागर तळाशीकर यांनी व्यक्त केले.

सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध नाट्य, चित्रपट व मालिका अभिनेते मा. सागर तळाशीकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक मा. प्रा. वैजनाथ होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर स्तरावर विद्यार्थ्यांनी व सहकारी प्राध्यापक यांनी जे कार्य केले आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. भारती विद्यापीठाचे संस्थापक मा. डॉ. पतंगराव कदम यांची दूरदृष्टी व महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार मंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळेच हे शक्य झाले.

मार्गदर्शनपर भाषणात मा. सागर तळाशीकर म्हणाले की, माणूस सर्व काही करतो परंतु स्वतःवर व स्वतःमध्ये असलेल्या कलेवर प्रेम करायला विसरतो. आनंदी राहण्यासाठी कला अवगत केली पाहिजे. एव्हढेच नव्हे तर निकोप प्रेम करायला शिकले पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने जीवनाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो.

अध्यक्षीय भाषणात प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की, चांगला अभिनेता तयार होण्यासाठी सांस्कृतिक पार्श्वभूमी असावी लागते. विशेषतः कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागते. कलाकार हे एक वेगळे रसायनअसते. 

कार्यक्रम प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल गॅदरिंग चेअरमन प्रा. डॉ. जया कुऱ्हेकर यांनी सादर केला. कनिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल गॅदरिंग चेअरमन प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले. उपस्थितांचे आभार कला व वाणिज्य प्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांनी मानले.

याप्रसंगी दुपारच्या सत्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर केले. याप्रसंगी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या प्राध्यापक व विद्यार्थी यांचा सत्कार पाहुण्यांचे करण्यात आला. याप्रसंगी प्रा. जी. एन. हंचे, विज्ञान प्रमुख प्रा. डॉ. प्रभा पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे, जिमखाना प्रमुख प्रा. अजय मराठे, अंतर्गत गुणवत्ता विभाग प्रमुख डॉ. अमित सुपले, व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. आनंदा सपकाळ त्याचबरोबर विविध विभागाचे प्रमुख, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)