डॉ. शिवाजीराव कदम यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
डॉ. शिवाजीराव कदम यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
भारती विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम यांना राज्यस्तरीय ‘शिक्षणरत्न जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने लक्ष्मणराव चोरगे क्रीडा संकुलात पुरस्कार वितरण समारंभ झाला. यावेळी डॉ. शिवाजीराव कदम यांना कृषिभूषण डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. शिवाजीराव कदम हे तीन दशकांहून अधिक काळ अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी पुना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य, भारती विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलपती म्हणून काम पहिले आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ आणि विद्वत्त सभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्यही होते.
(Dr. Shivajirao Kadam)
Post a Comment