Header Ads

Loknyay Marathi

विद्यापीठाच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी रतन टाटा यांची सल्लागार परिषदेवर नियुक्ती

विद्यापीठाच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी रतन टाटा यांची सल्लागार परिषदेवर नियुक्ती 

रतन टाटा यांचा युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आणि शैक्षणिक, औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव आता मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कारण मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर रतन टाटा यांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात आली आहे. 

उपायात्मक नियोजनासंबंधी विद्यापीठाला सल्ला देवून विद्यापीठाच्या विकासासाठी विशेष काम हाती घेच्याचा पूर्ण अधिकार सल्लागार समितीच्या अध्यक्षास असतो. त्यामुळे सल्लागार परिषदेवर अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्या नामनिर्देशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशासन यासंबंधीचे अहवाल, कृती योजना सादर करून त्याद्वारे कुलगुरूंना सल्ला देणे, वित्तीय साधनसंपत्ती व सुशासन निर्माण करणे, जेणेकरून विद्यापीठ शैक्षणिकदृष्ट्या कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम व्यवस्था निर्माण करणे, यासाठी विद्यापीठाची सल्लागार परिषद काम करणार आहे. 
(Ratan Tata appointed as Chairman of Mumbai University Advisory Council)