Header Ads

Loknyay Marathi

जीमेल शॉर्टकट्स माहीत आहेत ?


जीमेल शॉर्टकट्स माहीत आहेत ?


जीमेल ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी आणि लोकप्रिय असलेली ई-मेल सेवा आहे. जीमेलमध्ये असलेल्या विविध फीचर्समुळे आणि आकर्षक रंगसंगतीमुळे जीमेल वापरायला खूप सोपं आहे. जीमेलमधले कीबोर्ड शॉर्टकटचे (Keyboard shortcuts ) फिचर खूप कमी लोकांना माहीत आहे. या शॉर्टकट्सच्या मदतीनं मेल लिहिणं आणि नेव्हीगेशन खूपच सोपं झालं आहे. चला तर मग आज आपण हे कीबोर्ड शॉर्टकट्स नक्की काय आहेत आणि कसे वापराचे याच्याबद्दल जाणून घेऊ या...

कीबोर्ड शॉर्टकट्स अॅक्टिवेट कसे करायचे?
१. तुमच्या पीसी/लॅपटॉप/मॅकबुकमध्ये जीमेल सुरु करून साइन इन करा.
२. जीमेल चालू झाल्यावर वर-उजव्या बाजूला सेटिंग्जवर क्लिक करा.
३. त्यामध्ये तुम्हाला कीबोर्ड शॉर्टकट्सचा पर्याय दिसेल त्याला ऑन करा.
४. नंतर शेवटी सेव्ह चेंजेस करा. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट्स वापरू शकाल.

जीमेलमध्ये सध्या असलेले आणि वापरायला सोपे असे कीबोर्ड शॉर्टकट्स पुढीलप्रमाणे...
P- आधीचा ई-मेल वाचण्यासाठी
N- नंतरचा ई-मेल वाचण्यासाठी

Shift+Esc- मेन विंडोवर परत जाण्यासाठी

Ctrl+. - पुढच्या चॅटवर जाण्यासाठी

Ctrl+, - मागच्या चॅटवर जाण्यासाठी

Ctrl+ Enter- मेल पाठवण्यासाठी

Ctrl+Shift+K- cc टाकण्यासाठी

Ctrl+Shift+B- bcc टाकण्यासाठी

Ctrl+ K- लिंक टाकण्यासाठी

Ctrl+ M- स्पेलिंग सुचवण्यासाठी

G+N- पुढच्या पानावर जाण्यासाठी

G+P- मागच्या पानावर जाण्यासाठी


वरच्या शॉर्टकट्ससोबत तुम्ही जीमेलमध्ये तुमच्या स्वतःचे सुद्धा शॉर्ट कट्स बनवू शकता. यासाठी तुम्हाला पुन्हा सेटिंग्जमध्ये जाऊन न्यू शॉर्टकट्सचा पर्याय निवडावा लागेल. तर मंडळी आता इथून पुढे जीमेल वापरताना कीबोर्ड शॉर्टकट्स वापरायला विसरू नका.

(Keyboard shortcuts)