आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती रुजवावी- प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती रुजवावी- प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
सांगली | दि.१५/१०/२०१9
सांगली; १५ सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे असे जरी असले तरी आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्याच्यात वाचन संस्कृती रुजविण्याची नितांत गरज आहे असे मत शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य व डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'वाचन प्रेरणा दिवस ' साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे यांनी केले. वाचन प्रेरणा दिनाचे महत्व ग्रंथपाल सौ. जे. डी. हाटकर यांनी सांगितले.
मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की,वाचन संस्कृती रुजावी आणि वाचनसंस्कृती वाढवावी, ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ती सर्वांची जबाबदारी आहे.याप्रसंगी महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ.सौ.प्रभा पाटील,प्रा. उज्वला देसाई, प्रा. रुपाली कांबळे, डॉ. नितीन गायकवाड तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ, व्होकेशनल विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment