प्राचार्य प्रा. (डॉ.) विवेकानंद रणखांबे यांच्या बदलीनिमित्त भावनिक शुभेच्छा समारंभ व सत्कार सोहळा
प्राचार्य प्रा. (डॉ.) विवेकानंद रणखांबे यांच्या बदलीनिमित्त भावनिक शुभेच्छा समारंभ व सत्कार सोहळा
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. (डॉ.) विवेकानंद अर्जुनराव रणखांबे यांची कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय येथे प्राचार्यपदी बदली झाल्याबद्दल विशेष चहापान व शुभेच्छा समारंभ उत्साहात आणि अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. रणखांबे होते. यावेळी प्राचार्य यांच्या सुविद्य पत्नी सौ. रणखांबे मॅडम, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, डॉ. जी. व्ही. माळी, प्रा. भारती भाविकट्टी, माजी प्राध्यापिका डॉ. कुऱ्हेकर मॅडम, प्रा. कुलकर्णी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. रणखांबे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रणखांबे मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी विविध विभागातील प्राध्यापकांनी आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. रणखांबे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, विद्यार्थी-केंद्रित कार्यपद्धतीचा, संशोधन कार्याला दिलेल्या प्रोत्साहनाचा तसेच त्यांच्या माणुसकीपूर्ण आणि संवेदनशील स्वभावाचा गौरव केला. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाने शैक्षणिक, संशोधन तसेच प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधल्याचेही वक्त्यांनी मत व्यक्त केले.
आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. रणखांबे यांनी महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेम, विश्वास व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.महाविद्यालयाशी जुळलेले भावनिक नाते आयुष्यभर कायम राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच कडेगाव महाविद्यालयातील कार्यक्षेत्रातही संस्थेच्या प्रगतीसाठी समर्पितपणे कार्य करण्याचा दृढ निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ. कृष्णा भवारी यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी अंत्यत प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी प्राचार्य डॉ. रणखांबे यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात संपन्न झाला.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)













Post a Comment