आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतला निरोगी जीवनाचा संकल्प
सांगली, दि. 21 जून : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर योगमय झाला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे तसेच उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील सीनियर, ज्युनियर व व्होकेशनल विभागातील सर्व प्राध्यापक, एन. सी. सी. चे कॅडेट्स तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमासाठी योग मार्गदर्शक मा. विक्रम पवार आणि योगेश सर यांनी उपस्थित राहून विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक जीवनशैली कशी विकसित होते, याविषयी त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी उत्साहाने योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संकल्प केला.
या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे, एन.सी.सी. विभाग प्रमुख लेफ्ट. डॉ. महेश कोल्हाळ आणि एन.एस.एस विभाग प्रमुख डॉ. रुपाली कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती झाली असून, महाविद्यालयाच्या सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीचे दर्शन घडले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)










Post a Comment