डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास डॉ. मुकुंद बोधनकर यांची सदिच्छा भेट
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास डॉ. मुकुंद बोधनकर यांची सदिच्छा भेट
सांगली : डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख, भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) परीक्षा विभागाचे माजी प्रमुख तसेच शिवाजी विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचा पाया रोवणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. मुकुंद बोधनकर यांनी आज सपत्नीक सदिच्छा भेट दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विवेकानंद रणखांबे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ. बोधनकर दांपत्याचे स्वागत व सत्कार केला.
महाविद्यालयात नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या स्टाफरूममध्ये सर्व प्राध्यापकांनी अनौपचारिक गप्पागोष्टी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. भारती भाविकट्टी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे यांनी आपल्या मनोगतात डॉ. बोधनकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या नेतृत्वगुणांचे व शैक्षणिक योगदानाचे विशेष कौतुक केले. आजच्या या आगंतुकपणे आयोजित कार्यक्रमास मा. प्राचार्यांच्या सुविद्य पत्नी अड्व्होकेट सौ. मेघना रणखांबे या आवर्जून उपस्थित होत्या.
प्रा. डॉ. जी. व्ही .माळी यांनी डॉ. बोधनकर यांचा परिचय करून देत त्यांच्यासोबतच्या संस्मरणीय आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या.
यावेळी डॉ. मुकुंद बोधनकर यांनी प्रा. डॉ. जी. व्ही .माळी, प्रा. एस. व्ही. पोरे तसेच प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाने शैक्षणिक व भौतिक सुविधांच्या विकासात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा. डॉ. अमित सुपले यांनी मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)







Post a Comment