yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी


सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी प्रा. अमोल कुंभार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक समता, शिक्षण, लोककल्याण आणि सामाजिक न्यायाचे खरे पुरस्कर्ते होते. त्यांनी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन तसेच आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची 

 प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि लोकाभिमुख कार्यामुळे समाजातील वंचित घटकांना शिक्षण, स्वाभिमान आणि विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश आजही त्यांच्या कार्यातून प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी प्रतिपादन केले.

      या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)