Header Ads

Loknyay Marathi

रांगोळी व पोस्टर स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे यश ...

रांगोळी व पोस्टर स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे यश ...

सांगली :येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या कु.काजल चौगुले व रोहिणी भोसले या विद्यार्थिनींनी पेठ वडगाव (कोल्हापूर) येथे संपन्न झालेल्या रांगोळी व पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक संपादन केला.रोख रक्कम व प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
या स्पर्धा वन्यजीव सप्ताहानिमित्त श्री विजयसिंह यादव कॉलेज पेठवडगाव आणि श्री यशवंतराव पाटील सायन्स कॉलेज सोलांकुर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आल्या होत्या.
यशस्वी विद्यार्थिनींचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे आणि विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ सौ प्रभा पाटील यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थिनींना प्रा.डॉ वर्षा कुंभार व प्रा. नलेश बहिरम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)