मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्रदान
मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्रदान
सांगली- येथील भारती विद्यापीठ डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विशाल माळी व डीएमएलटीची कु. शिरीन शेख यांचा मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयामध्ये विविध उपक्रमामधील सहभाग व प्राप्त गुणांच्या आधारे उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करून दरवर्षी त्यांना सन्मानित केले जाते.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भारती भाविकट्टी, डॉ. भरत बल्लाळ, डॉ. मारुती धनवडे, प्रा. अरिफ मुलाणी आदी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment