कोव्हिड लसीकरण काळाची गरज - प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
कोव्हिड लसीकरण काळाची गरज - प्राचार्य
डॉ. डी. जी. कणसे
सांगली: संपूर्ण विश्वाला वेठीस धरणारी कोव्हिड-१९ नामक जागतिक महामारी नष्ट करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. सध्या महाविद्यालयांमध्ये शासनाने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली असून विद्यार्थ्यांनी या मोहिमेत आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महानगरपालिका आरोग्य केंद्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कोव्हिड लसीकरण मोहीम राबविण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख डॉ. पी. एम. पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे, प्रा. रूपाली कांबळे, डॉ. ए. एम. सरगर, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. एम. टी. कोल्हाळ , डॉ. व्ही. ए. सातपुते, प्रा. वाय. सी. धुळगंड तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या मोहिमेत काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. महानगरपालिका आरोग्य केंद्रातील उमेशा नवघरे, आशा वर्कर्स वैशाली गायकवाड, शारदा गवळी व मीनाक्षी सातपुते यांनी सर्वांना लस दिली.या लसीकरण मोहिमेत विद्यार्थी, प्राध्यापक व इत्तर सेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले व आभार प्रा. वाय. सी. धुळगंड यांनी मानले.
Post a Comment