सायबर गुन्हेगारीत महिलांची सुरक्षितता - एक गंभीर प्रश्न ..!
सायबर
गुन्हेगारीत महिलांची सुरक्षितता - एक गंभीर प्रश्न ..!
इंटरनेटमुळे जगातील सर्व लोक एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. नवतंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच हायटेक गॅझेटस् चा विस्तार होत आहे. सायबर विश्व हे मानवी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. परंतु सायबर गुन्हेगारी वाढण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे या तंत्रज्ञानावर लक्ष आणि देखरेख ठेवणाऱ्या सक्षम यंत्रणेचा अभाव होय. भारतीय सकाजात स्त्री हा महत्वाचा घटक आहे परंतु पूर्वीपासूनच पुरुषप्रधान समाजात स्त्रीला नेहमी दुय्यम स्थान आहे. २० व्या शतकात समाजसुधारकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे स्त्रिया आता कुठे मोकळा श्वास घेत आहेत व पुरुषांच्या बरोबरीने कामही करत आहेत. आज इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर स्त्रियासुद्धा करत आहेत. बऱ्याच महिला सोशल मीडियावर आपले मित्र-मैत्रिणींचे ग्रुप बनवून आपल्या विचारांची देवाण-घेवाण करत आहेत. जसजसे स्त्रिया समाजात मोकळ्या वावरू लागल्या व त्यांचा प्रवेश डिजीटल युगात झाला. डिजीटल युगातील अपुऱ्या ज्ञानामुळे आणि उत्साही सहभागामुळे त्यांच्यावरील अन्याय व अत्याचारही वाढू लागे आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पूर्वी पारंपारिक गुन्ह्यांमध्ये स्त्रियांची जेवढी नाचक्की झाली नव्हती तेवढी ती सायबर गुन्ह्यांत होवू लागली आहे. पोलीस दलात सायबर पोलीस विभाग सुरु होवून फक्त एक वर्षच उलटलेले आहे. सायबर पोलीसठाण्यात येणाऱ्या तक्रारी पाहिल्या असता त्यातील जवळपास सत्तर टक्के तक्रारी ह्या महिलांची बदनामी व तत्सम बाबींसंबंधी असतात. त्यामुळे डिजीटल आणि इलेक्ट्रॉनिक जगातील स्त्री आज जास्तच असुरक्षित असल्याचे दिसते.
एकीकडे इंटरनेट व सोशल मिडिया हे स्त्रियांसाठी वरदान ठरलेले असतानाच दुसरी बाजू म्हणजे त्यांच्यावर ऑनलाईन बदनामी तसेच ऑनलाईन स्वरूपातील गुन्ह्यांमुळे अनेक संसार उध्वस्त झालेले दिसून येत आहेत. यातून आत्महत्यांचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. यात सर्वात जास्त तरुण मुलीच बळी पडलेल्या दिसून येतात. कारण त्यांचा सोशल मिडीयाच वापर जास्त असतो व सायबर ज्ञान अपुरे असते. यामुळे त्या सहज सायबर गुन्हेगारांच्या अमिषांना बळी पडलेल्या दिसून येतात. यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे आहेत. उदाहरणार्थ –
सायबर स्टॉकिंग : सायबर स्टॉकिंग म्हणजे विविध ऑनलाईन यंत्रणांच्या माध्यमातून एखाद्या स्त्रीचा तिच्या इच्छेविरुद्ध सतत पाठलाग करणे आणि त्याद्वारे तिचा मानसिक छळ करणे, तिच्या सोशल मिडिया प्रोफाईलवर सतत मैत्रीची मागणी करणे, मेसेजला उत्तर दिले नाही तर तिला वारंवार सतत मेसेज पाठविणे, एखाद्या पोस्टवर त्रासदायक कमेंट्स करणे, इंटरनेटच्या माध्यामातून वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करणे होय. अशा स्टॉकिंगकरीता भारतीय दंड विधान संहितेतील कलम ३५४ ड अन्वये आरोपीला तीन वर्षापर्यंत शिक्षा व दंड होवू शकतो. याबात खबरदारी म्हणून महिलांनी त्यांचे संपर्क क्रमांक अनोळखी व्यक्तींना देण्याचे टाळावे तसेच सोशल मिडीया साईटवर त्यांचे संपर्क क्रमांक व इ-मेल आयडी हे कस्टमाईज करून ठेवावेत.
सायबर पोर्नोग्राफी: यामध्ये स्त्रीयांसंबंधी अश्लील चित्रण किंवा रेकॉर्डिंग करून ते विविध वेबसाईट, फेसबुक सारख्या साईटवर टाकणे होय. यात महिलांना बऱ्याच वेळा आपली कोणती कृती केव्हा व कशा प्रकारे रेकॉर्ड करण्यात आली व शेवटी ती इंटरनेटवर कशी प्रसारित केली, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे बदनामीच्या भितीने सदर महिला तक्रार देण्यास येत नाहीत व त्यामुळेच यातील महिला जीवाचे बरे-वाईट करून घेतात. यासाठी महिलांनी प्रामुख्याने चेंजिंगरूम, स्वचातागृहे, बाहेरगावी गेल्यानंतर राहण्याची ठिकाणे येथे दक्ष असले पाहिजे. या गुन्ह्याचा समावेश माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम ६६ ई, ६७ आणि ६७ अ मध्ये होतो. भारतीय दंड विधान संहितेतील विविध कलमे सुद्धा यात लावली जावू शकतात. आरोपीस तीन ते पाच वर्षापर्यंत शिक्षा व ५ ते १० लाख रुपयांपर्यंत दंड होवू शकतो.
मॉर्फिंग : यात मूळ छायाचित्र अशा पद्धतीने बदलणे, जेणेकरून त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून काही वेगळाच निष्कर्ष लावला जाणे होय. सायबर गुन्हेगार महिलांचे सोशल मिडिया साईटवरील फोटो डाऊनलोड करतात, त्यामध्ये हवा तो बदल करतात, हे बदल असे काही असतात की जणू काही ती विशिष्ट स्त्री त्या छायाचित्रामधील कृतीत खरोखर असल्याचे भासते व गुन्हेगार त्या महिलेला खोट्या धमक्या देवून तिच्याकडे पैशाची मागणी करतात व त्रास देतात. बऱ्याच महिला त्यांचे वैयक्तिक व कुटुंबासोबतचे फोटो फेसबुक तसेच इन्स्ट्राग्राम सारख्या साईटवर अपलोड करतात व आपल्या फोटोला किती लाईक मिळाल्या हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेत असतात. त्यामुळे महिला अशा गुन्ह्यांना बळी पडतात. यात फोटोग्राफच्या अनुषंगाने भारतीय दंड विधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जावू शकतात.
फिशिंग : यात खोट्या वेबसाईट काढून नोकरीच्या अमिषाने किंवा फेसबुकची खोटी अकौंट काढून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून खोटी मैत्री करून महिलांशी चॅटींग करून, त्यांचे कच्चे दुवे ओळखून, त्यांना विश्वासात ठेवून त्यांना अनेक प्रकारे लाखो रुपयांचा गंडा घातला जातो.
आर्थिक फसवणुकीचा फंडा : बहुतेक घरातील आर्थिक व्यवहार पुरुष बघत असतात त्यामुळे महिलांना ऑनलाईन बँकिंग, ई-वॉलेट याबाबत फारशी माहिती नसते. सायबर गुन्हेगार महिलांना फोन करतात व ‘बँक से मॅनेजर बोल राहा हूँ, आपका एटीएम कार्ड बंद हो गया है, अपडेट करना है की नहीं? असे विचारून त्या महिलेकडून एटीएम कार्डची माहिती व पासवर्ड घेतला जातो व आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे महिलांनी अशा गुन्ह्यांबाबत जागृत रहावे व आपले बँक अकौंट, एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड, इन्शुरन्स पॉलिसी किंवा आर्थिक व्यवहाराची माहिती कोणाला सांगू नये. अशा गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ सी व ६६ डी अन्वये कारवाई केली जाते.
सायबर पोलीसठाण्यांच्या माध्यमातून पोलिसांनी अशा सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु केलेले आहे. सायबर पोलीसठाण्यात आरोपीने डिलीट किंवा फॉरमॅट केलेला डाटा पुन्हा मिळवता येतो. त्यामुळे आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचता येते. सायबर विश्वाबाबत अपुऱ्या ज्ञानावर मात करण्यासाठी पोलीस दलामार्फत शैक्षणिक संस्था, बँका, सरकारी कार्यालये येथे सायबर गुन्ह्यांची माहिती देवून इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती केली जात आहे. प्रसार माध्यमांच्या सहाय्यानेही जाहिराती देवून सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक केले जात आहे. आजच्या जगात इंटरनेट, सोशल मिडिया ही मानवाची मुलभूत गरज झाली आहे. सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी सोशल मिडिया वापरूच नका, असे म्हणणेही संयुक्तिक होणार नाही. पण प्रत्येकाने इंटरनेट, सोशल मिडियाचा वापर हा जागरूकपणे व सद्विवेकबुद्धीने केला पाहिजे.
“सोशल मिडिया व सायबर विश्व हे दुधारी शस्त्र आहे व हे याचा वापर करणाऱ्यांच्या नीतिमत्तेवर अवलंबून आहे.”

Post a Comment