डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनीची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनीची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड
सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील बी.ए. भाग- २ ची विद्यार्थिनी कु. पूजा बसाप्पा बिराजदार हिची एन.सी.सी. विभागातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल १६ महाराष्ट्र बटालियन सांगली तर्फे जळगाव येथे होणाऱ्या 'एक भारत श्रेष्ठ भारत -I' (EBSB) या दहा दिवसीय राष्ट्रीय कॅम्प साठी निवड झाली आहे.
सांगली जिल्ह्यामधून निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे. राष्ट्रीय कॅम्प साठी निवड झाल्याबद्दल तीने विशेष आनंद व्यक्त केला. या यशाचे संपूर्ण श्रेय तीने आपण केलेल्या परिश्रमाबरोबर आपले आईवडील व महाविद्यालयाला दिले.
पूजाच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन तीचे अभिनंदन केले. या वेळी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना डॉ. पोरे म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे काम केले तर कोणतेही असाध्य काम साध्य होऊ शकते. या वेळी उपप्राचार्य डॉ.अमित सुपले यांनीही तीच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. सदर विद्यार्थिनीस एन.सी.सी. विभागाचे प्रमुख डॉ. महेश कोल्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी एन. सी. सी. समिती मधील सदस्य प्रा. अमर तुपे, डॉ. रूपाली कांबळे, प्रा. मंगेश गावित यांच्यासह महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment