Header Ads

Loknyay Marathi

पर्यावरण रक्षक शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणाईने घ्यावा---

पर्यावरण रक्षक शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणाईने घ्यावा---
प्राचार्य.डॉ. डी. जी. कणसे

१९ स्वराज्याचे गड राखणे जेवढे महत्वाचे तेवढेच पर्वत रांगांमध्ये असणाऱ्या दाट  झाडीचे रक्षण महत्वाचे आहे असे विचार मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पर्यावरण रक्षक होते. त्यांचा आदर्श घेऊन देशातील तरुणाईने कार्य करण्याची गरज आहे असे मत प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले.

सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस प्राचार्य. डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

उपस्थितांचे स्वागत करताना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे म्हणाले की,गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविणारे आणि जनतेच्या हितासाठी  आणि स्वराज्य निर्मितीसाठी लढणारे शिवाजी महाराज  पुरोगामी विचारसरणीचे होते त्यामुळेच ते तुमचे आमचे खऱ्या अर्थाने आदर्श आहेत.

मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की,शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार करीत असताना पर्यावरण रक्षणाचा विचार महत्वाचा मानला  त्यामुळे शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षक होते.

कार्यक्रमासाठी सौ. जयश्री कणसे,विज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे प्रा. श्रीकृष्ण मोहिते,प्रा. डॉ. नितीन गायकवाड सौ. जयश्री हटकर ,प्रा. रुपाली कांबळे,रवी पाटील त्याबरोबरच विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी  उपस्थित होते.