डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वच्छता अभियान
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वच्छता अभियान
सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाने १ ऑक्टोंबर २०२५ रोजी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
या वेळी महाविद्यालयाचे माजी प्र.प्राचार्य डॉ. संजय पोरे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, एन.सी. सी. विभाग प्रमुख डॉ. महेश कोल्हाळ, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए. एल.जाधव, डॉ. जी. व्ही. माळी आदि उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना डॉ. पोरे म्हणाले की, स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आपला समाज स्वच्छ व निरोगी ठेवणे हा आहे. महात्मा गांधीजींनी नेहमीच “स्वच्छता हीच खरी देवपूजा” असे सांगितले होते. त्यांची ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले आहे. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असेल तर आपले मन प्रसन्न राहते त्यामुळे अधिक उत्साहाने काम करण्याची ऊर्जा मिळते. जेव्हा आपले शरीर, मन आणि विचार स्वच्छ असेल तेव्हा चांगल्या चारित्र्याचा जन्म होतो. मुळात परिसर स्वच्छ करण्यापेक्षा तो अस्वच्छ होणारच नाही याची काळजी प्रत्येक विद्यार्थ्यांने घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
एन. सी. सी. चे समन्वयक डॉ. महेश कोल्हाळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्वच्छता केल्याने रोगराई कमी होते, पर्यावरण शुद्ध राहते, प्रत्येकाने “माझा देश स्वच्छ ठेवणे हीच माझी जबाबदारी” असे मानून काम केले, तर भारत नक्कीच सुंदर, स्वच्छ व निरोगी बनेल.
या स्वच्छता अभियानात महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागाचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)




Post a Comment