डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा
सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार वृक्ष लागवड अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "जागतिक पर्यावरण दिन" उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. पोरे यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ए. एस. सी. कॉलेज, पलूसचे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. जी. फाळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. पोरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अनेक वर्षांपासून पर्यावरणाची हानी झाली आहे. भावी पिढीला ही धोक्याची घंटा असून योग्यवेळी जागृत होऊन पर्यावरण टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण केले पाहिजे.
नागरिकांमध्ये जनजागृती हवी यासाठी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे. पाण्याचा विनियोग योग्य पद्धतीने केला पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळता आला पाहिजे. विजेची बचत केली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण विषयी सजग राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. विकास आवळे, कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा. अरूण जाधव, प्रा.जयश्री हाटकर, डॉ. तृषांत लोहार, डॉ. वर्षा कुंभार, डॉ. वंदना सातपुते, प्रा. यशवंत धुळगंड, प्रा.मंगेश गावीत, डॉ. आनंद सपकाळ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment