Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एच. एस. सी. बोर्ड परीक्षा बैठक व्यवस्थेचे आयोजन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एच. एस. सी. बोर्ड परीक्षा बैठक व्यवस्थेचे आयोजन


सांगली: सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एच. एस. सी. बोर्ड अंतर्गत मार्च २०२३ च्या परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी दिली.
         
ते पुढे म्हणाले की या महाविद्यालय केंद्रांतर्गत सांगलीवाडी येथील लक्ष्मीबाई पाटील विद्यालय हे उपकेंद्र असून बैठक क्रमांक x०३३०७३ ते x०३३७७७ असे एकूण ७०० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत. २१ फेब्रुवारीपासून या परीक्षा सुरू होत असून परीक्षेस उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. कणसे यांनी केलेे आहे.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)