Header Ads

Loknyay Marathi

अपायकारक ओझोन थांबविण्यासाठी मानवनिर्मित प्रदूषणावर निर्बंध घालणे गरजेचे: प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे

अपायकारक ओझोन थांबविण्यासाठी मानवनिर्मित प्रदूषणावर निर्बंध घालणे गरजेचे: प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे


सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाने विज्ञान संघटना व अंतर्गत गुणवत्ता हमी सेल यांच्या संयोगाने आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे हे बोलत होते.


पुढे बोलताना डॉ. कणसे म्हणाले पृथ्वीच्या वातावरणात दोन प्रकारचे ओझोन असतात एक चांगला ओझोन व दुसरा वाईट ओझोन. पृथ्वीच्या सजीव सृष्टीस अपायकारक असणारा ओझोन हा वायू प्रदुर्षणामुळे होऊ निर्माण होतो. या अपायकारक ओझोनमुळे दम्यासारखे आजार देखील फोफावतात. केमिकल युक्त फटाक्यांमुळे त्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सजीव सृष्टीच्या संरक्षणाकरिता प्रदूषण निर्माण करणाऱ्या सर्व घटकांबरोबर फटाक्यांवर निर्बंध आणणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ओझोन दिवसानिमित्त भौतिकशास्त्राच्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या विविध पोस्टरचे प्रदर्शन यावेळी आयोजित केले होते. या प्रदर्शनात विदयार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देणाऱ्या सर्वांना ओझोन विषयी माहिती यावेळी सांगितली.

या कार्यक्रमला कला आणि वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, प्रा. सौ. भारती भावीकट्टी, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. पी. नाडे, डॉ. वर्षा कुंभार, श्री. अमर तुपे, डॉ. रुपाली कांबळे, श्री. नंदकुमार नाटके यांच्या सहित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यां यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. पी. नाडे यांनी केले तर आभार श्री. यशवंत धुळगंड यांनी मानले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)