Header Ads

Loknyay Marathi

नामशेष होत चाललेल्या वन्य पशु पक्षाबाबत जागृती निर्माण करणे ही काळाची गरज : डॉ. डी. जी. कणसे

नामशेष होत चाललेल्या वन्य पशु पक्षाबाबत जागृती निर्माण करणे ही काळाची गरज : डॉ. डी. जी. कणसे


सांगली : वन्यजीवांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला नैसर्गिक अधिवास व   होऊ घातलेला विकास यातील असमतोल कारणीभूत आहे . त्यातून  नवीन अधिवासाच्या शोधात  मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष होऊन मोठी  जीवितहानी होते. त्यामुळे वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने का होईना, नामशेष होत चाललेल्या वन्य पशु पक्षाबाबत जनजागृती निर्माण करण्याची  व  त्यांच्या संरक्षणाकरिता हातभार लावण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी कणसे यांनी केले.
    
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या  प्राणीशास्त्र विभागाच्या  वतीने आयोजित करण्यात आलेल्या वन्यजीव सप्ताहातील पोस्टर्स,  मॉडेल, रांगोळी, प्रश्नमंजुषा व घोषवाक्य  स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी  ते बोलत  होते. 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत जागतिक  वन्यजीव सप्ताह निमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  
        
पुढे बोलताना ते म्हणाले की वन्यजीव संवर्धनाच्या जनजागृतीसाठी समाजामध्ये व विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी  अशा प्रकारचे उपक्रम आवश्यक आहेत.
 
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ. वर्षा कुंभार  यांनी केले, तर आभार श्री. संदिप सरगर  यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नलेश बहिरम यांनी केले .या सप्ताहा निमित्त आयोजित रांगोळी, मॉडेल  व पोस्टर स्पर्धांमध्ये एकूण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला  त्यातील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे

पोस्टर स्पर्धा:
१. आफ्रीन मुलाणी (प्रथम) बी. एस्सी - २
२. प्रणाली अंकाले (व्दितीय) बी. एस्सी - १
३. आश्विनी पाटील (तृतीय) बी. एस्सी - ३
४. श्रावणी मोलापे (उत्तेजनार्थ) बी. एस्सी - १
५. तवनीत कटारिया (उत्तेजनार्थ) बी. एस्सी - १

रांगोळी स्पर्धा:
१. अनुराधा जाधव (प्रथम) बी. एस्सी - १
२. आफ्रीन जमादार (व्दितीय) बी. एस्सी - ३
३. अनु केवट (तृतीय) बी. एस्सी - १
४. प्राची पेटारे (उत्तेजनार्थ) बी. एस्सी - १
५. साक्षी जमादार, अमृता जाधव (उत्तेजनार्थ) बी. एस्सी - २

मॉडेल स्पर्धा:
१. अर्पिता तांदलवाडे (प्रथम) बी. एस्सी - २
२. सना पठाण (व्दितीय) बी. एस्सी - १
३. तृप्ती भांबुरे (तृतीय) बी. एस्सी - १
४. अंजली चोले (उत्तेजनार्थ) बी. एस्सी - १
५. अनुराधा केंगार, वैशावी गिरी (उत्तेजनार्थ) बी. एस्सी - १

प्रश्नमंजुषा स्पर्धा:
१. सना पठाण (प्रथम) बी. एस्सी - १
२. प्रतिक पाटील (व्दितीय) बी. एस्सी - १
३. आफ्रीन जमादार (तृतीय) बी. एस्सी - ३, सुहाना मुजावर (तृतीय) बी. एस्सी - १
४. पियुष वाडकर (उत्तेजनार्थ) बी. एस्सी - १

घोषवाक्य स्पर्धा:
१. आकांशा चव्हाण (प्रथम) बी. एस्सी - १
२. सना पठाण (व्दितीय) बी. एस्सी - १
३. सादिया जमादार (तृतीय) बी. एस्सी - १
४. सुहाना मुजावर (उत्तेजनार्थ) बी. एस्सी - १

या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून   वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. एस. एन. बोऱ्हाडे, आणि अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग  समन्वयक प्रा. डॉ. ए. आर. सुपले यांनी काम पाहिले .यावेळी कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ विभागाचे विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, प्राणीशास्त्र विभागातील   सौ. रूपाली माने  तसेच तसेच  वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर सहकारी  उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)