डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे वक्तृत्व स्पर्धेत यश
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे वक्तृत्व स्पर्धेत यश
सांगली:भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी गणेश वसंत साळुंखे याने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हिंदी विभाग आयोजित हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. त्याने 'हिंदी भाषा और युवाओं का भविष्य' या विषयावर भाष्य केले. गणेश साळुंखे या विद्यार्थ्याला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषा अवगत आहेत. बहुभाषिक गणेश हा उत्तम वक्ता आहे त्याचबरोबर तो उत्तम लेखनही करतो. या पूर्वी त्याने अनेक वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले आहे.
शिवाजी विद्यापीठातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत गणेशने प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले त्याबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनीही त्याचे कौतुक केले. त्याला राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना सातपुते, डॉ. सचिन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्रा.भारती भावीकट्टी, प्रा. वासंती गावडे, डॉ. रूपाली कांबळे, प्रा. जयश्री हटकर, प्रा. रोहिणी वाघमारे, डॉ. वर्षा कुंभार, सौ. अरुणा सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी गणेशचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment