वैज्ञानिक उपकरणे हाताळणे कार्यशाळा सखोल ज्ञान प्राप्त करण्याचे व्यासपीठ: मा. डॉ. एच. एम. कदम
वैज्ञानिक उपकरणे हाताळणे कार्यशाळा सखोल ज्ञान प्राप्त करण्याचे व्यासपीठ: मा. डॉ. एच. एम. कदम
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे हाताळणे प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवार, दि. २९ ते ३१ ऑगस्ट २०२४ रोजी या दरम्यान संपन्न झाली. या कार्यशाळेचे अध्यक्ष भारती विद्यापीठाचे सांगली विभागीय संचालक मा.डॉ. एच. एम. कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 'इक्विपट्रॉनिक्स' कंपनीचे मुख्य सल्लागार मा. श्री. मुस्तफा बादशाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. व्ही.पोरे उपस्थित होते.
मा. डॉ. कदम अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले की, विज्ञान विभागात शिकत असताना अनेकदा उपकरणे हाताळणी बाबतच्या अडचणी निर्माण होतात आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व प्राध्यापक व प्रयोगशाळा सहायक यांना माहिती मिळवण्यासाठी ही कार्यशाळा एक मोठे वरदान आहे, तसेच वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक कामासाठी वापरले जाणाऱ्या विविध उच्च तंत्रज्ञान उपकरणांची सखोल ज्ञान प्राप्त करण्याचे एक साधन म्हणून या कार्यशाळेकडे बघितले पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.बादशाह म्हणाले की, उपकरणाच्या तांत्रिक अडचणी सोडवण्याच्या पद्धती बद्दल माहिती दिली.सर्व प्राध्यापकांना वैज्ञानिक उपकरणे हाताळताना होणाऱ्या संभाव्य चुका लक्षात आणून दिल्या तसेच या कार्यशाळेमध्ये वैज्ञानिक अभियांत्रिकी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांचा परिणामकारक वापर करता येईल, असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. पोरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रयोगशाळा उपकरणाबाबत निर्माण होणाऱ्या अनेक समस्या आहेत, त्यावर मात कशाप्रकारे करता येईल याचे ज्ञान या कार्यशाळेतून मिळाले. तसेच उपकरणाचा वापर संबंधी कौशल्य विकसित करणे त्यांचे योग्यरित्या देखरेख करणे, प्रयोगशाळेतील काम अधिक परिणामकारक बनवणे हेच उद्दिष्ट या कार्यशाळेचे आहे.
या कार्यशाळेत पहिले दोन दिवस पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले व तिसऱ्या दिवशी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक या कार्यशाळेत उपस्थित होते.काही प्राध्यापक हे कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातून आले होते. प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्याचे काम 'इक्विपट्रॉनिक्स' कंपनीचे मुख्य सल्लागार मा. श्री. मुस्तफा बादशाह व त्यांचे सहकारी श्री. साहू आणि श्री. लक्ष्मण यांनी काही निवडक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन केले.
या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ.डी.पी. नाडे यांनी काम पाहिले तर या कार्यशाळेचे स्वागत व प्रस्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एच.व्ही.वांगीकर यांनी केला. तसेच या कार्यशाळेचा संपूर्ण आढावा डॉ. टी आर. लोहार यांनी सांगितला. तर या कार्यक्रमाचे आभार प्रा. एन. जी. बहिरम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सौ. आर. डी. वाघमारे यांनी केले.
या कार्यशाळेसाठी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव डॉ. मारुती धनवडे, डॉ. आर. एन. देशमुख यांच्यासह वरिष्ठ विभाग तसेच कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment