डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे मैदानी क्रीडा स्पर्धेत यश-
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे मैदानी क्रीडा स्पर्धेत यश-
सांगली:
भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील बी.ए.भाग-१ विद्यार्थिनी कु.निकिता सुनील पवार हिने महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय ज्युनियर मैदानी क्रीडा स्पर्धेत ८०० मीटर धावणे या क्रिडा प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकविला.
सदर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २० सप्टेंबर २०२४ रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे या ठिकाणी पार पडल्या.अशाप्रकारे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यार्थिनीने यश मिळवून भारती विद्यापीठ आणि डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे नाव उज्वल केले.
या यशाबद्दल डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. या मिळालेल्या यशाबद्दल कौतुक केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.अमित सुपले यांनीही विद्यार्थिनीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अमर तुपे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थिनीचे कौतुक करून तिला शुभेच्छा दिल्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment