Header Ads

Loknyay Marathi

राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्काराने प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे सन्मानित

राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्काराने प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे सन्मानित 




शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबाबत इंटींग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव या संस्थेने राष्ट्रीय गुणवंत प्राचार्य गौरव पुरस्काराने भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांना सन्मानित करण्यांत आले. 

हरमल-गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण  मंडळांच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या भव्य दिव्य समारंभात माजी केंद्रीयमंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांना राष्ट्रीय गुणवंत प्राचार्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरव पुरस्कार मेडल, विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व म्हैसूर फेटा देऊन प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री कणसे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील निवडक पुरस्कार प्राप्त व्यक्तींना गौरविण्यात आले आहे.  
माजी आमदार संपत बापू पवार पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे,अरविंद घट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
     
भारती विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांची प्रेरणा घेऊन प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आपल्या कर्तुत्वशक्तीने समाजात मोहोर उमटविली  आहे. डॉ. डी.जी. कणसे यांनी पदवी व पदव्युत्तर स्तरावर ३७ वर्षे अध्यापन कार्य करीत शिवाजी विद्यापीठाच्या कार्य क्षेत्रात प्राचार्य पदावर गेली १६ वर्षे कार्यरत आहे. डॉ. डी.जी. कणसे यांनी  शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाच्या विविध  प्रशासकीय समितीत कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये व क्रीडा क्षेत्रामध्येही  अनमोल यश प्राप्त केले आहे. नॅक, शैक्षणिक व संशोधनाच्या क्षेत्रामध्ये महाविद्यालयाने भरीव कामगिरी केली. महाविद्यालयामध्ये राष्टीय, राज्यस्तरीय संशोधन परिषदा,चर्चासत्रे, कार्यशाळा, इन्स्पायर शिबीर आदींच्या माध्यमातून वैज्ञानिक शास्त्रज्ञांना, कुलगुरू, प्राचार्य,प्राध्यापक, विचारवंताना, साहित्यीकांना, लेखकांना, कवींना तसेच तज्ञ लोकांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळवून दिले. विद्यार्थ्याच्यामध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ज्ञानभारती साहित्य संमेलन साहित्यिक व संपादक आपल्या भेटीला आदी नाविण्यपूर्ण उपक्रम डॉ. डी.जी. कणसे यांनी  राबविले आहेत. अविष्कार संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या संशोधन करण्यासाठी चालना दिली आहे. विकासाभिमुख शिस्तप्रिय,उत्तम प्रशासक, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून  शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये त्यांची ख्याती आहे. विविध विषयावरील आयोजित राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदा, कार्यशाळा मध्ये त्यांनी मुख्य व्याख्याता, प्रमुख वक्ता म्हणून सहभाग घेतला आहे.विद्यार्थीभिमुख सवेंदनशील प्रशासनातील व्यक्तिमत्त्व  अशी त्यांची खासियत आहे.त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक  व संशोधन कार्याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाबरोबर १६ हून अधिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. डॉ. कणसे यांच्या या कार्याची  दखल घेऊन  इंटींग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्कार प्राप्त झालेबद्दल भारती विद्यापीठ विश्वविद्यालय कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, 
भारती विद्यापीठ प्र-कुलगुरू, कार्यवाह माजी राज्य मंत्री डॉ. विश्‍वजित कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती अध्यक्षा विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम. कदम,शिवाजी विद्यापीठ कुलगुरू व पदाधिकारी  साहित्यिक, संपादक, पत्रकार,वकील, डाॅक्टर, नातेवाइक तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांचे अभिनंदन केले आहे.  या पुरस्कराने डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीमधील आणखी एक मानाचा तुरा प्राप्त झालेला आहे.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)