डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी महाविद्यालयाचा भारती विद्यापीठाशी सामंजस्य करार
डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी महाविद्यालयाचा भारती विद्यापीठाशी सामंजस्य करार
येथील भारती विद्यापीठाचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालय आणि डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी, कसबे डिग्रज यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे. या करारामध्ये विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय कार्यक्रम,जोड प्रकल्प, प्रगत संशोधन अशा बहूआयामी बाबी राबविण्यात येणार आहेत.
भारती विद्यापीठाचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने या सामंजस्य कराराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी, कसबे डिग्रज चे डॉ. संदीप पाटील, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ. ए. आर. सुपले, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विकास आवळे, प्रा. भारती भाविकटृटी, प्रा. हर्षल वांगीकर, प्रा. मंगेश गावित आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. संदीप पाटील म्हणाले "दोन्ही संस्था मिळून भविष्यात संशोधन उपक्रम राबवू व गरीब, होतकरू विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देऊ तसेच वैद्यकीय सेवेतील रोजगारनिर्मिती आणि त्यातील संशोधन यांची सांगड कशी असावी ह्याबद्दल सविस्तर चर्चा केली.
प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी कराराद्वारे संयुक्तिरीत्या आंतराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र व कार्यशाळा घेऊ व भविष्यात आंतराष्ट्रीय पातळीवर संशोधन करण्यासाठी दोन्ही संस्था पुढाकार घेतील असे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी शिक्षक विनिमय, संशोधन शोधनिबंध, प्रस्ताव, सेमिनार, कौशल्ययुक्त कोर्सेस संयुक्तरित्या राबविण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment