Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा
 
सांगली: दि.8/3/23 भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली मध्ये लेडीज असोसिएशन द्वारे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'हास्ययोग' या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इनरव्हील क्लब ऑफ सांगली मिडटाऊन चे अध्यक्ष सौ. जया जोशी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच 'बंधन आणि सतीचे वाण' या कविता सादर केल्या. सांगली परिसरामध्ये हास्य क्लब मोठ्या प्रमाणामध्ये चालतात. या क्लब ला जागतिक मान्यता आहे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, एड्सग्रस्त रोगी, पोलीस, कैदी यांच्यासाठी या हास्यक्लब चा उपयोग झाला आहे. मदन कटारिया या हास्ययोग चे जनक आहेत. जगात 110 देशांमध्ये हे हास्यक्लब चालतात. हसल्याने भरपूर फायदे होतात, शरीरातील विविध भागासाठी हास्ययोगाचे फायदे दिसून येतात, हसल्याने महिलांच्या चेहऱ्याचा व्यायाम होतो हसल्याने ताणतणाव कमी होतो, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हसायला हवे. असे मनोगत सौ. जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी हास्ययोगाचे अनेक प्रात्यक्षिके करून दाखवली.
       
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले,  देशामध्ये अनेक महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहेत. मुलांच्यापेक्षा मुलीचे प्रमाण सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. महिलांना सहकार्य करणे त्यांना समानतेची वागणूक देणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे. तसेच आपणास जीवनातील ताण - तणावातून मुक्त व्हायचे असेल तर सर्वांनी हसायला पाहिजे, हसण्याचा आनंद घेतला पाहिजे यासाठी हास्ययोग महत्त्वाचा आहे. त्यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्यांच्या हस्ते उपस्थित महिलांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
       
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक लेडीज असोसिएशन समन्वयक व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी केले. सूत्रसंचलन सौ. शिल्पा साळुंखे यांनी केले.आभार प्रा. सौ. वर्षा कुंभार यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, सिनियर प्राध्यापक टी. आर. सावंत, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)