डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.एस.व्ही.पोरे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. पोरे म्हणाले की, आपल्या महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यात प्रत्येक विद्यार्थ्याने उत्स्फूर्तपणे भाग घेऊन कौशल्य विकसित करावे. तसेच विद्यार्थ्यांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणीची जाणीव विद्यार्थी दशेत असणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वच्छता, शिस्तप्रिय व क्रियाशील राहणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे, विद्यार्थी हा मुख्य केंद्रबिंदू असल्यामुळे महाविद्यालयाचे वातावरण नेहमी चैतन्याने भरलेले असले पाहिजे. गुणवान विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देण्यात येणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी हा उत्तमातून सर्वोत्तमा कडे गेला पाहिजे. या वेळी भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा प्रेरणादायी संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
तीन दिवस चाललेल्या या उद्बोधन कार्यक्रमात काही तज्ज्ञ प्राध्यापकांनी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, शिष्यवृत्त्या, ग्रंथालय, एन.सी.सी.,क्रीडा विभाग, एन.एस. एस.,प्लेसमेंट सेल, लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण, परीक्षा विभाग, विविध कोर्सेस याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सुविधांचा
जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच महाविद्यालयाने घालून दिलेले नियम आणि शिस्त यांचे पालन केले पाहिजे असे आवाहन डॉ. पोरे यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य नॅक समन्वयक डॉ. अमित सुपले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.अमोल कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. तर आभार डॉ. डी.व्ही.फड यांनी मानले.
या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर सेवक व प्रथम वर्षात शिकणारे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment