Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात बयाबाई कदम स्मृतिदिन व हिंदी दिन साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात बयाबाई कदम स्मृतिदिन व हिंदी दिन साजरा



सांगली : डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या वेळी हिंदी दिनाचे औचित्य साधून भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ . संजय पोरे म्हणाले की, मातोश्री बयाबाई कदम यांनी अत्यंत कष्टातून आपल्या मुलांना शिकविले. आपल्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना त्या काळात उमगले होते. माता ही केवळ जीवनाचा आधारस्तंभ नसून ती एक शक्ती असते याचे उत्तम उदाहरण असलेल्या मातोश्री बयाबाई कदम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम यांना घडविले. 
     
हिंदी दिनाविषयी बोलताना पुढे ते म्हणाले की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे प्रत्येकाला ती बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. कबीराचे दोहे आणि कवी प्रेमचंद यांच्या कविता म्हणजे हिंदी साहित्यातील मैलाचे दगड आहेत. जीवनाचे तत्त्वज्ञान त्यात सामावले आहे. 
        
याप्रसंगी हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ. सचिन जाधव यांनी हिंदी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या वेळी कु. गणेश साळुंखे, कु. अंजली चोले आणि कु. फैज पेंढारी या विद्यार्थ्यांनी मातोश्री बयाबाई कदम यांचे जीवन व हिंदी दिनाविषयी मनोगते व्यक्त केली 
     
या विचार मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. रवींद्र काटकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले.      
          
या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)