Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एच. एस. सी. बोर्ड परीक्षा बैठक व्यवस्था

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एच. एस. सी. बोर्ड परीक्षा बैठक व्यवस्था


सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी विज्ञान शाखेची (एच. एस. सी. बोर्ड) परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत आहे. या महाविद्यालयाचा केंद्र क्र. ३३२ असून या केंद्रांतर्गत सांगलीवाडी येथील लक्ष्मीबाई पाटील विद्यालय व दत्तात्रय हरी चव्हाण कन्या विद्यालय ही उपकेंद्रे आहेत. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आसन क्र. X034684 ते X035573 असे एकूण ८८९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत.

सदरच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी अर्धा तास हजार रहावे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावर मोबाईल, स्मार्टवॉच, गणकयंत्र इत्यादी तत्सम साधने वापरण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रावर कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घेणे आवश्यक आहे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)