Header Ads

Loknyay Marathi

एच्. आय. व्ही. एडस् जनजागृतीत युवकांचे योगदान महत्त्वाचे

एच्. आय. व्ही. एडस् जनजागृतीत युवकांचे योगदान महत्त्वाचे


दि. २०/०१/२०२४- जगभरातील कित्येक लोक एच्. आय. व्ही. ने बाधित आहेत. या एच्. आय. व्ही. मुळे मानवी शरीर कित्येक आजारांचे घर बनते. अशा या विषाणूला नेस्तनाबूत करायचे असेल तर त्यासाठी युवकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून, येथील भारती विद्यापीठाच्या डॅा. पतंगराव कदम महाविदयालयात रेड रिबन क्लब तर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. सदर कार्यशाळा ही “एच्. आय. व्ही. / एडस् जनजागृतीत युवकांचे योगदान” या विषयावर आयोजित केली होती. या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले, सशक्त युवक सशक्त पिढी घडवितो. यासाठी देशाचा युवक निरोगी व सशक्त असायला हवा. निरोगी राहण्याकरिता मानवी मनावरील ताबा फार महत्त्वाचा ठरतो, अन् त्यामुळेच एच्. आय. व्ही. सारखे संक्रमण टळू शकते. या कार्यशाळेकरिता डॉ. बी. बी. बल्लाळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. सदर मार्गदर्शनात त्यांनी  एच्. आय. व्ही. चा संपूर्ण इतिहास अत्यंत सुलभपणे सर्वांसमोर मांडला. याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार  एच्. आय. व्ही. बाधीतांची सध्याची आकडेवारी ३९ दशलक्ष इतकी आहे असे ते म्हणाले. तसेच युवक म्हणजे कोण? त्यांचा वयोगट कोणता? यामध्ये युवकांना नेमके काय करता येइल. विदेशात वेश्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना परवाना दिला जातो.आपल्याकडे अश्या परवान्यासाठी जाचक अटी आहेत. एच्. आय. व्ही. कसा पसरतो? त्याची कारणे, समज व गैरसमज, तसेच त्याला आळा घालण्याकरिता योग्य उपाय यांसारख्या मुद्द्यांवर वैज्ञानिक पद्धतीने त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेकरिता जिल्हा एडस् समुपदेशन केंद्रप्रमुख श्री. पी. एस्. संकपाळ व सौ.रुपाली तिरमारे उपस्थित होते. उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे याच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन करण्यात आले. 



कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला व विद्यार्थ्यांमधील एच्. आय. व्ही./ एडस् बद्दलची जागरूकता तपासण्याकरिता प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली व त्यांच्या विविध प्रश्नांचे शंकानिरसण करण्यात आले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. सौ. व्ही. एस्. कुंभार यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक रेड रिबन क्लबच्या प्रमुख प्रा. कु. भारती का. भावीकट्टी यांनी केले व डॉ. व्ही. बी. आवळे यांनी आभार मानले.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)