डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत एस.टी. बस पासचे वितरण
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत एस.टी. बस पासचे वितरण
सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत प्रवास योजना अंतर्गत अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना मोफत एस.टी. बस पासचे वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. (डॉ.) डी. जी. कणसे, वाहतूक नियंत्रक सांगली मा. महादेव कोलोलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य मा. प्रा. (डॉ.) कणसे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण हे मुलींच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी साधन आहे. शासनाच्या मोफत एस.टी. बस पास योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणातील आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील. या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थिनींनी नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहून उच्च शिक्षणाची स्वप्ने साकार करावीत. तसेच महाविद्यालयामार्फत उपलब्ध असलेल्या डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्तीसह विविध शिष्यवृत्ती योजना व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. आर. एस. काटकर, प्रा. एस. डी. पाकले तसेच अकरावी व बारावी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)

Post a Comment