डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात इयत्ता ११ वी च्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात इयत्ता ११ वी च्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी इयत्ता ११ वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. महाविद्यालयीन जीवनाची सकारात्मक सुरुवात व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता ११ वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे प्राचार्य मा. प्रा. (डॉ.) डी. जी. कणसे यांच्या हस्ते गुलाबपुष्प व बॉलपेन देऊन विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्राचार्य प्रा.(डॉ.) कणसे मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्लेसमेंट, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. रविंद्र काटकर आणि एम. एल. टी. विभागप्रमुख प्रा. आनंदा सपकाळ, प्रा. सौ. वासंती गावडे, प्रा. शंकर पाकले, प्रा. प्रकाश केंगार, प्रा. राजाराम भोळे, प्रा. सुरेश माने, प्रा. बाबासो पाटील, प्रा. दिपक पवार यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, विविध सुविधा आणि उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयीन जीवन हे केवळ पदवी मिळविण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचा सुवर्णकाळ आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचे नियोजन आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग याद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)












Post a Comment