yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रेड रिबन क्लबतर्फे एचआयव्ही–एड्स जनजागृती उपक्रम संपन्न - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रेड रिबन क्लबतर्फे एचआयव्ही–एड्स जनजागृती उपक्रम संपन्न

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रेड रिबन क्लबतर्फे एचआयव्ही–एड्स जनजागृती उपक्रम संपन्न


भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रेड रिबन क्लबतर्फे युवा दिनाचे औचित्य साधून एचआयव्ही–एड्स जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विवेकानंद रणखांबे होते.

कार्यक्रमात आयसीटीसी समुपदेशक सौ. रुपाली तिरमारे व श्री. प्रदीप कांबळे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. सौ. रुपाली तिरमारे यांनी एचआयव्ही म्हणजे काय, एड्स म्हणजे काय याची माहिती देत हा आजार कोणत्या मार्गाने पसरतो व कोणत्या मार्गाने पसरत नाही, याबाबत सविस्तर विवेचन केले. तसेच समाजात या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री. प्रदीप कांबळे यांनी एड्स होऊ नये यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची उदाहरणांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी या आजाराचे गांभीर्य, संसर्गाची कारणे व त्यावरील प्रतिबंध याविषयी सोप्या व समजण्याजोग्या भाषेत माहिती दिली. एड्सच्या उच्चाटनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रा. डॉ. सुपले यांनी रेड रिबन क्लबच्या कार्याचे कौतुक केले. एड्स प्रतिबंधामध्ये महाविद्यालयीन युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून या आजाराचे बळी पडण्याचे प्रमाण युवा वर्गात अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाकडून असे जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबवले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी केले. रेड रिबन क्लबच्या स्थापनेपासून आजपर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत युवकांनी मिळवलेले ज्ञान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावे, असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमास प्रा. अरुण जाधव, प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रुपाली कांबळे यांनी केले तर आभार प्रा. आरीफ मुलाणी यांनी मानले.






(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)