डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर
सांगली: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षेअंतर्गत केंद्र क्रमांक ३३२ डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या विज्ञान शाखेच्या परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
यानुसार बैठक क्रमांक X०३४८५२ ते X०३५५१८ या विद्यार्थ्यांची परीक्षा डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी येथील ब्लॉक क्रमांक १ ते २६ मध्ये होणार आहे. बैठक क्रमांक X०३५५१९ ते X०३५६९२ या विद्यार्थ्यांची परीक्षा ल. पा. पाटील विद्यालय, सांगलीवाडी येथील ब्लॉक क्रमांक २७ ते ३३ मध्ये होणार आहे, तर बैठक क्रमांक X०३५६६३ ते X०३५८१४ या विद्यार्थ्यांची परीक्षा दत्तात्रय चव्हाण हायस्कूल, सांगलीवाडी येथील ब्लॉक क्रमांक ३४ ते ३८ मध्ये होणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षेदरम्यान कोणताही मोबाईल फोन, डिजिटल घड्याळ अथवा गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) वापरण्यास सक्त मनाई असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे यांनी सांगितले. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना केले आहे.
सदर परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून प्रा. ए. एल. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment