yuva MAharashtra डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन साजरा - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन साजरा

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन' साजरा


सांगली: डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाच्या वतीने ‘जागतिक पुस्तक दिन' साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून इंग्रजी विभागप्रमुख प्रा.रोहिणी वाघमारे, प्रा. आर. एस. काटकर उपस्थित होते.


सदर कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना इंग्रजी विभागप्रमुख प्रा. रोहिणी वाघमारे म्हणाल्या की, जगत्विख्यात नाटककार 'विल्यम शेक्सपियर’ यांची आज ४६१ वी जयंती. २३ एप्रिल हा दिवस यांचा जन्म आणि मृत्यू दिन. हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी २०१० रोजी ‘इंग्रजी दिन’ म्हणून सुरू केला. विल्यम शेक्सपियर यांच्या नाटककर, अभिनेता, लेखक, साहित्यिक अशा नाट्यक्षेत्रातील विविध योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणूनही सुरु केला.
    
यानंतर प्रा. आर. एस. काटकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विल्यम शेक्सपियर यांना 'बार्ड ऑफ एव्हॉन’ म्हणून ओळखले जाते, ते इंग्रजी साहित्यातील महान नाटककार होते, त्यांनी केवळ नाटके लिहिली नाहीत तर १७०० हून अधिक इंग्रजी शब्दांची निर्मिती केली व त्यांनी लिहिलेले ३७ नाटके, १५४ सॉनेटस आणि कविता आजही जगभरात वाचल्या जातात. जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी दिन हा केवळ शेक्सपियरच्या कलाकृतींना श्रद्धांजली नाहीतर इंग्रजी साहित्याचा उत्सवही आहे.
         
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे म्हणाले की, दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस जगभरात ‘जागतिक पुस्तक दिन' व ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकांमधून भाषा, संस्कृती, मानवी भावना, समाज आणि राजकारण याचे प्रभावी चित्रण केले गेले आहे त्यामुळे हे साहित्य आजही संपूर्ण जगभर अभ्यासले जाते. यांचे नाट्य साहित्य अजरामर आहे. विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन हा दिवस केवळ इंग्रजी भाषेचा नाही तर ही भाषा जगभर पसरलेल्या संस्कृतीचा व संवादाचा उत्सव आहे. विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्यातील महान योगदानाबद्दल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून केवळ एक दिवस साजरा न करता त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेवून अनेक साहित्यीक निर्माण झाले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. 


सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी विभागामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्देश विद्यार्थ्यांना विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्याची अधिक माहिती करून देणे, पुस्तकांचे महत्त्व अवगत करून देणे व वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होणे हा आहे. 
        
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल व कार्यक्रम समन्वयक प्रा. जयश्री हाटकर यांनी केले व जागतिक पुस्तक दिनाचे महत्व विषद केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. ओंकार चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव, डॉ. नरेश पवार, डॉ. दादा नाडे, डॉ. अमर तुपे, प्रा.ओंकार चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)